सारथी फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
- सांगली/प्रतिनिधी
सारथी प्रणालीवर अनुज्ञप्तीच्या एकूण 18 सेवा प्रत्यक्षपणे फेसलेसद्वारे वितरीत करण्यात आलेल्या आहेत. या सारथी फेसलेस सेवा प्रणालीचे संकेतस्थळ https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice हे आहे. जास्तीत जास्त नागरिक व अनुज्ञप्तीधारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 1 हजार 388 अनुज्ञप्तीधारकांनी लाभ घेतला आहे. ऑनलाईन सारथी फेसलेस (संपर्करहित) सेवांमध्ये शिकाऊ लायसन, दुय्यम शिकाऊ लायसन प्रत, शिकाऊ लायसनमध्ये पत्त्यात बदल, शिकाऊ लायसन / पक्के लायसन /वाहक लायसनमध्ये भ्रमणध्वनी अद्ययावत करणे, दुय्यम लायसन प्रत, नुतनीकरण लायसन, पक्क्या लायसनमध्ये पत्त्यात बदल, पक्क्या लायसनमध्ये बदल आदींसह एकूण 18 सेवांचा समावेश होतो. तरी जास्तीत जास्त नागरिक व अनुज्ञप्तीधारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.