Uncategorized

संतोष वाघमारे यांना महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’*

कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व उल्लेखनीय सेवाकार्याची दखल; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

*संतोष वाघमारे यांना महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’

कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व उल्लेखनीय सेवाकार्याची दखल; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

सोलापूर : प्रतिनिधी

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाभावाच्या जोरावर पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मूळचे बेलाटी येथील रहिवासी श्री. संतोष वाघमारे यांना महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवाकार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या या यशाबद्दल बेलाटीसह सोलापूर जिल्ह्यात सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सध्या सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले श्री. संतोष महादेव वाघमारे यांनी आपल्या सेवाकाळात जबाबदारी, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रभावीपणे काम केले आहे. पोलीस दलातील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतानाच नागरिकांशी सौजन्याने व आपुलकीने वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सहकारी आणि नागरिकांमध्येही विशेष विश्वास संपादन केला आहे.
उच्च शिक्षित असलेले संतोष वाघमारे हे सर्वांशी मनमोकळेपणाने व मनमिळावू स्वभावाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. आपल्या साधेपणामुळे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांचे मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातही चांगले संबंध आहेत. कर्तव्याच्या ठिकाणी कठोर शिस्त आणि वैयक्तिक जीवनात आपुलकी व माणुसकी, असा त्यांचा आदर्श समतोल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी, प्रामाणिक सेवाभाव आणि उल्लेखनीय कार्याची योग्य दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवडले आहे. हा सन्मान केवळ संतोष वाघमारे यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसह बेलाटी गावासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

या सन्मानामुळे संतोष वाघमारे यांच्या कार्याला मिळालेली ही मानाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच बेलाटी परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close