Uncategorized

जत तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी धरेप्पा कट्टीमनी* उत्कृष्ट कामकाजाची दखल

उत्कृष्ट कामकाजाची दख; संघटनात्मक अनुभवाच्या बळावर नवी जबाबदारी

*जत तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी धरेप्पा कट्टीमनी*

उत्कृष्ट कामकाजाची दख; संघटनात्मक अनुभवाच्या बळावर नवी जबाबदारी

जत : प्रतिनिधी

केंद्रप्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्याच्या जत तालुका अध्यक्षपदी श्री. धरेप्पा मारुती कट्टीमनी यांची निवड झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, संघटनात्मक अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यशैली यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

मूळचे जत तालुक्यातील करजगी गावचे रहिवासी असलेल्या कट्टीमनी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामकाज करत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणे, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणे आणि प्रत्येक प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. शिक्षक संघटनेच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

  • केंद्रप्रमुख हे शैक्षणिक प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असल्याने केंद्रप्रमुखांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे मांडणे, त्यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या उपक्रमांना अधिक चालना देणे, ही आगामी काळातील महत्त्वाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर कट्टीमनी यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close