सामाजिक

येळवीत आज बाळूमामा देवस्थानच्या वतीने गुणवतांचा सत्कार सोहळा*

जयराष्ट्र वृत्तसेवा
जत/प्रतिनिधी

जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता देवस्थान ठिकाणी येळवी व खैराव येथील १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी तसेच नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येळवी येथील योगेश्री शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल , ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल व खैराव येथील संत भिमदास महाराज करांडे माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवल्याबद्दल प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक यामध्ये वैष्णवी दऱ्याप्पा सांगोलकर, दिव्या विनायक गानमोटे, रोहिणी ज्ञानोबा नुलके, स्नेहल नवनाथ चौगुले, तातोबा शंकर धुलगुडे, श्रद्धा साधू रेवे, हर्षल बापू क्षिरसागर, रोहिणी नागेश पवळ, ऋषिकेश ईश्वर खांडेकर, पुनम यशवंत कुंभार, प्रियांका सूर्यकांत जगदाळे, गौराबाई नामदेव नूलके, सृष्टी दीपक शिंदे, साक्षी दादासो गायकवाड, आयेशा शायद खलिफा यांच्यासह सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव म शिंदे, मुख्याध्यापक आण्णासाहेब भोसले, माध्यमिक शिक्षक भारत गंगणे, एमपीसी स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक महसूल अधिकारी पदी निवड झालेली योगेश्री शिंदे यांचा ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेत्तर संघटनेचे नेते , येळवीचे सुपुत्र यांनी शिल्ड व सत्कार सोहळयासाठी विशेष सहकार्य केले आहे.
कार्यक्रमानंतर सुखदेव शिंदे व भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास हभप तुकारामबाबा महाराज, शिक्षकेत्तर व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व बाळूमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close