गणेश मडावी यांचा जिल्हा परिषदेत सत्कार*
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्तीबद्दल सभापती सावित्री रवी-पाटील यांच्या हस्ते गौरव

- *गणेश मडावी यांचा जिल्हा परिषदेत सत्कार
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्तीबद्दल सभापती सावित्री रवी-पाटील यांच्या हस्ते गौरव

सांगली, प्रतिनिधी
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी गणेश मडावी यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सांगली जिल्हा परिषदेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती सौ. सावित्री तम्मनगौडा रविपाटील यांच्या हस्ते मडावी यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सभापती सावित्री रविपाटील यांनी गणेश मडावी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राज्य कार्याध्यक्ष म्हणून कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कारप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सदस्या सौ. शोभा खोत, सौ. सिंधुताई पाटील तसेच सदस्य धैर्यशील थोरात, दत्तात्रय पाटील अवधूत प्रशांतकुमार आदी उपस्थित होते.
तसेच समितीचे सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मडावी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गणेश मडावी यांनी या सन्मानाबद्दल सभापती सावित्री रविपाटील, समितीचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



